बुलडाणा, दि. १२ : जिल्ह्यातील बरेच तालुके बाल कुपोषणात आघाडीवर आहेत. कुपोषणमुक्त ग्राम अभियानातून जिल्ह्यात १ लाख ९४ हजार बालकांचे वजन करण्यात आले होते; त्यापैकी ५ हजार ६६३ बालके अत्यंत कमी वजनाची आढळून आली. गतवर्षीपेक्षा हा आकडा एक हजाराने जास्त होता. कुपोषणाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडेफार कमी दिसत असले, तरी ते समाधानकारक नाही. बुलडाणा जिल्हय़ातील काही तालुके बाल कुपोषणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अधिक आर्थिक मदत आणि चांगल्या दर्जाचा आहार पुरविण्यासाठी विविध योजना येथे सुरू आहेत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडेफार कमी दिसत असले, तरी ते समाधानकारक नाही. याची संबंधित यंत्रणेने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.विविध अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती माता व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार, तसेच शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार व आरोग्य विभागाच्यावतीने रोग प्रतिबंधात्मक लसी, व्हिटॅमिन यासह इतर औषधी देण्यात येते. शिवाय जिल्हय़ातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी कुपोषणमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पाच हजारांवर बालके कमी वजनाची!
By admin | Published: September 12, 2016 2:00 AM