लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पश्चिम वऱ्हाडात गेल्या तीनवर्षापासून अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका बसत असून लखपती, करोडपती यासारख्या नावाने प्रचलीत असलेल्या सोयाबीनच्या वाणाला फळधारणाच झाली नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. जिल्ह्यात यावर्षी ३ लाख ६१ हजार क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्तीच्या भितीने बहुतांश शेतकऱ्यांनी लखपती वाणाकडे पाठ फिरवली आहे.