लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी व रेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्या व्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहेजिल्ह्यात काही वर्षात रेशन च्या काळ्या बाजार होण्याच्या घटना मध्ये कमालिची वाढ झाली असून यांची अनेक प्रकरने उघडीस आली आहेत. रेशनचा माल दुकानात न आणता परस्पर विकने व कार्ड धारक व्यक्तीच्या नावावरील धान्य दुसºयाला देने आपल्या मर्जितील व जवळच्या व्यक्तींना धान्य देणे यांच्या सोबतच वेळेवर धान्य गोडाउन मधूनस न उचलणे यांच्या सारख्या अन्य प्रकरणात मोठ्या प्रमानात वाढ झाली होती. या सर्वाची दखल राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री ना. गिरीष बापट यांनी घेतली असून ज्या व्यक्तिंनी आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत (लिंक)जोडले आहे. अशाच अधिकृत लाभर्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळणार आहे.असे आदेश दुकानदार यांना सबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहे. रेशन कार्डला आधार सक्ति केल्या मुळे डिजिटल व्यवहारात या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती ना.गिरीष बापट यांनी दिली आहे. रेशन कार्ड धारकाने आपला अंगठा सबंधित यंत्राला लावल्या नंतरच त्याला धान्य मिळणार आहे. यामुळे रेशन दुकानदारांना परस्पर धान्य विक्री करता येणार नसून आधार सक्तिचा आदेश हा १ आॅक्टोबर पासून सुरु होणार आहे.
रेशन दुकानातील काळ्या बाजाराला बसणार आळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 7:33 PM
मोताळा : रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी व रेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्या व्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे
ठळक मुद्दे१ आॅक्टोबर पासून रेशन दुकानावर आधार सक्तीचेजिल्ह्यात रेशनचा काळ्या बाजार होण्याच्या घटनामध्ये कमालिची वाढ