लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जागा खाली कारणावरून स्वत:च्या सुनेची हत्या करणाऱ्या सासऱ्यास खामगावन्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. शेगाव तालुक्यातील भोटा येथे २३ एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली होती.
शेगाव तालुक्यातील जलंब पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या भोटा येथे जागा खाली करण्यावरून निवृत्ती निंबाजी घुले आणि त्यांची सून शारदा श्रावण घुले(३०) यांच्यात वाद झाला. यावेळी संताप अनावर झालेल्या निवृत्ती घुले यांनी शारदा हीच्या मानेवर, डोक्यात आणि अंगावर कुºहाडीने वार केले. त्यामुळे ती ठार झाली. याप्रकरणी जलंब पोलिसांनी आरोपी विरूध्द अप क्रमांक २१/१३ भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जलंब पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरिक्षक संतोष ताले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. याप्रकरणी न्यायायालयाने १३ साक्षीदार तपासले. त्सबळ पुराव्याच्या आधारे तद्वर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एम. पठाडे यांच्या न्यायालयाने सासरा निवृत्ती निंबाजी घुले यास आजन्म कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. उदय आपटे यांनी बाजू मांडली.