खामगाव : पणन महासंघात गत २० वर्षांपासून नोकर भरती करण्यात आली नसल्याने मनुष्यबळाची वाणवा आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू करताना अनेक मयार्दा येणार आहेत. पणन महासंघाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातून केवळ तीसच खरेदी केंद्र सुरू करणे शक्य असल्याने यावेळी गतवषीर्पेक्षा अर्धेच खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात कापूस वेचणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी कापसाची वेचणी करीत आहेत. काही शेतकरी कापसाची विक्री करीत आहेत. मात्र, अल्यल्प भावात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. अजूनही पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. नोव्हेंबर महिन्यात खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती आहे. पणन महासंघातील अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहे. गत २० वर्षांपासून नवीन भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आहे. गतवर्षी राज्यात ९२ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.बुलडाणा जिल्ह्यात चार खरेदी केंद्र होते. यावर्षी केवळ तीसच खरेदी केंद्र सुरू करण्याऐवढे मनुष्यबळ पणन महासंघाकडे आहे. त्यामुळे रात्यात गतवर्षीच्या तुलनेत अध्यार्पेक्षाही कमी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात केवळ दोनच खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. मनुष्यबळाची समस्या यंदा जाणवणार असल्याचे चित्र आहे.
गत वीस वर्षांपासून नोकरभरती करण्यात आली नाही. अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळ कमी आहे. यावर्षी राज्यात केवळ ३० खरेदी केंद्र सुरू करण्याएवढे मनुष्यबळ पणन महासंघाकडे आहे.- प्रसेनजीत पाटीलसंचालक, पणन महासंघ, महाराष्ट्र