लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बचतगटांचा कर्जपुरवठा विविध फायनान्स कंपन्यांनी थांबवलेला आहे. त्यामुळे विविध बचत गटांच्या सभासद महिलांची अडचण होत असून, कर्जपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या व काही बँकांकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता; परंतु सुमारे १0 महिन्यांपूर्वी अमरावती जिल्हय़ात काही बचतगटाच्या महिलांनी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी करून कर्जाची परतफेड थांबवली. अकोला, बुलडाणा जिल्हय़ातही काही बचतगटाच्या सभासदांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले. बचतगटांचे कर्ज माफ झाल्याची अफवासुद्धा पसरली होती. त्यामुळे काही फायनान्स कंपन्यांचे नुकसान होऊ लागल्याने त्यांनी नव्याने कर्जवाटप करणे बंद केलेले आहे. खामगाव शहर व परिसरात ग्रामशक्ती (फुलर्टन) ग्रामीण कुटा, एल अँन्ड टी, दिशा फायनान्स, निर्मल-उज्ज्वल, एचडीएफसी बँक आदींकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता. यातील ग्रामीण कुटा, एचडीएफसी बँक यांचा कर्जपुरवठा सद्यस्थितीत सुरू आहे; मात्र अन्य काही कंपन्यांच्यावतीने अद्याप कर्जपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे महिला सभासदांची अडचण होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू होत असतानाच्या काळात या फायनान्स कंपन्यांकडून नियमित कर्जाची परतफेड करणार्या सभासद महिलांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंंंतचे कर्ज दिले जात असते. ते यावर्षी अनेक बचत गटांना मिळू शकले नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या काळात त्यांची अडचण झालेली आहे. वसुली नसल्याने वाटप बंदज्या फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर परिणाम झाला त्याच कंपन्यांनी नवीन कर्जवाटप बंद केलेले आहे. तर ज्यांची वसुली व्यवस्थित सुरू आहे, त्या कंपन्यांनी वाटप सुरू ठेवलेले आहे. थकबाकीचे प्रमाण कमी झाल्यास थांबलेले वाटप पूर्ववत सुरू होऊ शकते अशी माहिती एका कंपनीच्या अधिकार्याने दिली.ग्रामीण कुटाच्या वतीने बचत गटांचे कर्जवाटप सुरूच आहे. वसुली पूर्ण होत असल्याने वाटप थांबविण्याचा प्रश्नच नाही. मे, जून व जुलै महिन्यात आम्ही दरवर्षी शैक्षणिक कर्जाचे वाटप करतो. ते यावर्षीही देण्यात येत आहे. महिलांनी कर्जाची परतफेड नियमीतपणे केली तर त्यांना कोणतीच अडचण येणार नाही.-रवीकुमार सूर्यवंशीशाखा व्यवस्थापक, ग्रामीण कुटा
बचतगटांचा कर्जपुरवठा ठप्पच!
By admin | Published: June 24, 2017 5:38 AM