लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरा येथील एका बनावट ऑनलाईन सेंटवर छापा टाकून तेथील साहित्यासह ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत नांदुरा येथील जितेंद्र यशवंत जुनगडे (३४ रा, गांधी चौक), विजय सुभाष चिंचोळकर (३१, रा. शिवशंकरनगर) आणि शेख नईम शेख आसीम (३५, रा. कुरेशी नगर)या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर आणि नगदी तीन हजार रुपये असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात लॉटरी अधिनियम, महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन तिघाही आरोपींना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, नीलेश शेळके, मोहमद साजिद अब्दुल समद, केदार फाळके, नदीम कासम शेख, गजानन पुंडलिक गोरले, वैभव श्रीकृष्ण मगर, संजय मिसाळ यांनी ही कारवाई केली.
नांदुऱ्यातील बनावट ऑनलाईन लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:22 AM