शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Lockdown in Buldhana : रस्त्यांवर शुकशुकाट, जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:09 AM

Lockdown in Buldhana: निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यात येत असून पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या दहा दिवसाच्या कडक निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान शहरी भागासह ग्रामीण भागातही या कठोर निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यात येत असून पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. प्रामुख्याने कोरोनाचे हॉटस्पॉट, संभाव्य गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या असून मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या जिल्ह्याच्या चार सीमाही सील करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुसरीकडे बुलडाणा शहरास, मेहकर, चिखली, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोदसह सर्वच तालुक्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जिल्ह्यातील २,६०० पोलिसांचा या कामी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरी भागात पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कठोर निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत होती. एकट्या बुलडाणा शहरात ४२ व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.बुलडाण्यात ६५ पोलीस कर्मचारीबुलडाणा शहरात ६ अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तथा चार भरारी पथकांचे साहाय्य घेत कठोर निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नगर पालिकेचेही कर्मचारी त्यांना सहकार्य करत आहे. १४ चौरस किमी विस्तार असलेल्या बुलडाणा शहरातील प्रत्येक नगरामध्ये पालिकेने बॅरिकेडस उभारून नागरिकांची वर्दळ वाढणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. शहरात ४४ ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. चिखली शहराच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. मेहकर, लोणार, देऊळगाव राजा येथेही असेच चित्र आहे.

सात जणांवर कारवाईn बुलडाणा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणारऱ्या सात जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रूपये दंड वसुल केला. संचारबंदीत दुकान चालु ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावही कारवाई करण्यात आली.

पालिका, महसूल व ग्रामपंचायतीचे सहकार्यजिल्ह्यातील नागरी भागाची लोकसंख्या ६ लाखांच्या आसपास आहे तर ग्रामीण भागातील लोकसंख्या ही १९ लाखांच्या घरात आहे. त्यात आता वाढ झालेली आहे. मात्र ही लोकसंख्या विचारात घेऊन पोलीस, पालिका, महसूल आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिसांची मदत घेऊन कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाेलीसांनी कठाेर निर्बंधांची अंमलबजावणी अत्यंत गंभीरतेने केली असून शहरी व ग्रामीण भागात पाेलीसांची पथके गस्त करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या