शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

डोणगावात महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप!

By admin | Published: July 04, 2017 12:09 AM

डोणगाव विकासापासून दूर असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : डोणगाव हे राज्य महामार्गावरील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, ही ग्रामपंचायत विविध समस्या व कारणांनी गाजत असतानाच वार्ड क्रमांक दोनमध्ये कोणताच विकास नसल्याने व वार्डात जाण्यासाठी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत तर रस्त्यावर घाणीतून वार्डवासीयांना जावे लागते. खांबावर लाईट नाहीत. त्यामुळे वार्डवासीयांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत वारंवार ग्रामपंचायतला कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या वार्ड क्रमांक दोनमधील महिलांनी ३ जुलैला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायत गाठली; परंतु ग्रामपंचायतमध्ये कोणीच हजर नसल्याने व केवळ ग्रामपंचायत उघडी असल्याने या त्रस्त महिलांनी चक्क ग्रामपंचायत बंद करुन तिला कुलूप लावून रोष व्यक्त केला.सध्या डोणगाव ग्रामपंचायत अतिक्रमण, स्वच्छता, अनियमितता या कारणाने गाजत असतानाच याच ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक दोन मधील कौशल्या नगर येथे ऐन पावसाळ्यात रस्ते नसल्याने नागरिकांना या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने वार्डातील महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत गाठली; परंतु ग्रामपंचायत केवळ इमारत उघडी असून, कुणीच हजर नसल्याने महिलांंनी ग्रामपंचायतला कुलूप लावून रोष व्यक्त करीत आमच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतमध्ये जवळपास ५० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कुलूप ठोकून वरिष्ठांचे लक्ष वेधले, तर समस्या दूर न झाल्यास महिलांनी आणखी आंदोलन करु, असे सांगितले.