शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:16 PM

बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत.

- नीलेश जोशी  बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. १२ व्या लोकसभेपासून मतविभाजन हा बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे यंदा मतविभाजनाचा फॅक्टर नेमकी कोणती राजकीय समिकरणे बिघडवतो या मुद्द्यावर राजकीय जाणकारांसह उमेदवारांचेही चिंतन सुरू आहे. त्यातच घटत्या सरासरी मतदानाच्या टक्केवारीमुळेही मतविभाजनाचा फॅक्टर प्रबळ बनत चालला आहे.गेल्या पाच निवडणुकांचा विचार करता १९९८ चा अपवाद वगळता बुलडाणा लोकसभा मतदार संघात सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे बुलडाणा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला अलिकडील काळात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली नकारात्मकतेची लाट ही त्यांना कितपत मायनस करते यावरही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून व्युव्हरचना आखण्यात येत असतानाच मतविभाजनाचा आपल्यास कसा फायदा पोहोचतो यादृष्टीने युतीचे उमेदवार व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्या भाषणातील आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून ही बाब प्रतिबिंबीत होते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीमधील तिसरा उमेदवार असून या उमेदवारास कितपत जनाधार मिळतो या मुद्द्यावरही सध्या राजकीय वर्तुळात काथ्याकुट सुरू आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. २००९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघ खुला झाल्यानंतर हे दोघे पहिल्यांना एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी ३.२९ टक्के मताच्या फरकाने विद्यामान खासदारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर मात केली होती. मात्र त्याच तिसर्या आणि चौथ्या नंबरच्या उमेदवारांनी १४.५२ टक्के मते घेतल्याने आघाडीला मतविभाजनाचा मोठा फटका बसला होता. यात बीएसपीचा ९.५८ टक्के अर्थात ८१ हजार ७६३ मतांचा मोठा वाटा होता.२००४ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मुकूल वासनिक यांच्यातील तुल्यबळ लढतीमध्येही काँग्रेला ६.७७ टक्के मतविभाजानाचा फटका बसत आनंदराव अडसूळ असूळ विजयी झाले होते. भारीप-बमस, बसपा आणि एका अपक्षाने त्यावेळी एकूण मतदानाच्या ६.७७ टक्के मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला ७.८७ टक्के कमी मते मिळाली होती. १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचा फटका पुन्हा एकदा काँग्रेसला बसून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना त्यांच्या तुलतने ६.३८ टक्के मते जादा मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी एक लाख ३३ हजार १६५ मते घेत काँग्रेसच्या पराभवात मोठा वाटा उचलला होता. त्यावेळी तब्बल १८.८८ टक्के मतांचे विभाजन झाले होते. दरम्यान, १९९८ मध्ये मात्र मतविभाजनाचा फटका शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना बसला होता. ७.९७ टक्के मताच्या फरकाने मुकूल वासनिक त्यावेळी निवडून आले होते. जनता पाटी, जनता दलाच्या उमेदवारांनी त्यावेळी चांगली मते घेतली होती. त्यामुळे ४.१५ टक्के मतांचा फटका त्यावेळी शिवसेनेला बसला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक