ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: लोकसभा मतदार संघामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. बुलडाणा लोकसभा मतदार संघामधील एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार असून उमेदवारांच्या विजयाच्या गुढीला महिलांच्या ‘वोट’चा कळस महत्त्वाचा ठरणार आहे. प्रचार ऐन रंगात आलेला असताना उमेदवारांसाठी मतदारांतील कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू आहे. उमेदवारांना संसदेपर्यंत जाण्यासाठी जशी तरुण मतदारांची आवश्यकता आहे, अगदी तशीच महिला मतदारांचे मतदानही महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकींचा अपवाद वगळता, पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदानाचा हक्क बजावल आहे.
४७ %महिला मतदार
बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये ४७ %महिला मतदार आहेत. त्यांची संख्या ४ लाख ३० हजार २७५ आहे. 56%हे गेल्या निवडणुकीतील महिला मतदानाचे प्रमाण आहे. २०१४ च्या लोकसभेत ७ लाख ४९ हजार ४५३ महिलांनी मतदान केले. 61%हे मागील (२०१४) लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी आहे. एकूण १५ लाख ९१ हजार ४९६ मतदान झाले होते. त्यापैकी निम्मे मतदान हे महिलांचे होते. त्यामुळे महिला मतदारांचा वाटा महत्त्वाच्या ठरत आहे. महिलांचा वाटा महत्त्वाचा लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदार १७ लाख ४५ हजार ८५६ आहे. त्यापैकी ८ लाख ३० हजार २७५ मतदार महिला आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महिला मतदार उमेदवारांसाठी महत्त्वाच्या आहेत.