बुलढाणा: लाेकसभेच्या बुलढाणा मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे़ सकाळी मतदानात वाढ झाली आहे. बुलढाणा सहा विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले हाेत़े त्यानंतर आता मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान झाले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघात १४.३१ टक्के, चिखलीत १७.७१ टक्के, जळगाव जामाेद १५.९३ टक्के, खामगाव १८. ३२ टक्के, मेहकर २२.४२ टक्के तर सिंदखेड राजा मतदार संघात १८.७० टक्के मतदान झाले आहे. सकाळी ९ वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडले आहेत. सकाळच्या सत्रात बुलढाणा लाेकसभा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.