नीलेश जोशी,बुलढाणा: १८ व्या लोकसभेसभेसाठी बुलढाण्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत असून ११६ टेबलवर ही मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे.
दरम्यान, मलकापूर रोडवरील शासकीय आयटीआच्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तथा समर्थक मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमायला लागले आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल वोटिंगची मतमोजणी प्रारंभ होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मतमोजणी सुरू होईल. दुसरीकडे मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी हे पहाटे सहा वाजतात मतमोजणी केंद्रावर दाखल झाले होते. ३ जून रोजी त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले होते. १६०० कर्मचाऱ्यांवर मतमोजणीची मदार आहे. मतदानानंतरच्या ३८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अवघ्या काही तासात निकालाचा फैसला होणार आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये २१ उमेदवार आपले भाग्य आजमावत असून महायुतीचे प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडकर यांच्या लढत होत आहे. अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके आणि वंचित बहुजन आघाडीचे वंसत मगर हेही या निवडणुकीत चर्चेत रहाले आहे. दरम्यान सलग तीन वेळा निवडून आलेले प्रतापराव जाधव चौकार मारण्याच्या तयारी ठेवून आहे तर आपल्या राजकीय कारकिर्दीमधील मोठी निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेेडेकर हेही आपल्या विजयाबाबत आश्वस्त आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाही जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे शेतकऱ्यांचाच विजय होईल असा विश्वास आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचा निकाल हा अवघ्या काही तासात हाती येणार आहे. बुलढाणा लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी ६३.०३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान आता थोड्याच वेळात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.