लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : घरी शौचालय नसल्याने शहरातील काही रस्त्यांची गोदरी झाली होती; मात्र मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी स्वच्छतेचा ध्यास धरून त्यानुषंगाने स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे आज गोदरी ही मॉर्निंग वॉक ट्रॅक झाली आहे.स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी शहरांना स्वच्छतेची व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सं पूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ व हरित महाराष्ट्रासाठी प्रभावीपणे राबविले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगर परिषद क्षेत्र हगणदरीमुक्त झाले की नाही, याची चाच पणी करण्यासाठी राज्यस्तरीय तपासणी पथक लोणार येथे १८ सप्टेंबर रोजी पोहोचले होते. पथकाने शहराची सर्वत्र पाहणी केली असता, शहरातील असे काही कुटुंबे त्यांना आढळून आले की आर्थिक परिस्थिती हलाखीची अस तानाही त्यांनी शौचालय बांधले आहे. हमाली करून उदरनिर्वाह करणार्या शेख हारून शेख यासीन यांनी ६ बाय १0 च्या घरात शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने शहरवासीयांसमोर एक नवा आदर्श घडवला आहे. त्यामुळे एका कार्यक्रमात स्वच्छ महराष्ट्र अंतर्गत राज्यस्तरीय समि तीने शेख हारून शेख यासीन यांचा गौरव करीत स्वच्छ तेसाठी पुढाकार घेतलेल्या अनेक कुटुंबीयांना भेटी देऊन त्यांची प्रशंसा केली. यावेळी अधिकारी व पदाधिकार्यांची उ पस्थिती होती.
शौचालय बांधण्यात पुढाकार घेणार्यांचा सत्कारराज्यस्तरीय तपासणी पथकाने आर्थिक परिस्थिती नसताना आणि अपुरी जागा असताना शौचालय बांधणार्या कुटुंबीयांचा सत्कार केला. यावेळी समिती सदस्य तथा अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेट्ये, परतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाराम इरलोळ, गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सदस्य सतीश देवानंद कायंदे यांच्यासह मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महम्मद खान, सभापती सीमा नितीन शिंदे उपस्थित होते.
शहरातून ग्रामीण भागाकडे जाणार्या काही रस्त्याच्या वाटेवर खुल्या जागेवरील गोदरी संपुष्टात आणून आज तो परिसर मॉर्निंग वॉक ट्रॅक बनला आहे. लोणार शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरवासीयांनी सिहांचा वाटा घेत पुढाकार घे तला आहे.- विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, लोणार.