शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

लोणार सरोवर परिसर बनला मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:24 AM

जनावरांचे लसीकरण लटकले बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी यांसह ...

जनावरांचे लसीकरण लटकले

बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी यांसह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यात हे लसीकरण केले जाते. गेल्यावर्षी उशीर झाला आणि आता पुन्हा हे लसीकरण लटकले आहे़

रेती वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था

देऊळगाव मही : डिग्रस बु. परिसरात रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डिग्रस बु.पासून पाबळपर्यंत रस्त्यावरील डांबर उखडले आहे. या रस्त्यावर सतत रेतीची टिप्परद्वारे वाहतूक होत आहे. रस्त्याची क्षमता कमी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त जडवाहतूक दररोज होते. अंदाजे २५ ते ३० टनापेक्षा जास्त भरलेले रेती टिपर दररोज शेकडोंच्या संख्येत वाहतूक करतात.

ग्रामीण भागात नालेसफाईला वेग

मेहकर : ग्राम पंचायतीच्या वतीने मान्सूनपूर्व नाल्यांच्या सफाईचे काम सध्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे नियोजन दिसून येत आहे.

बियाणांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

हिवरा आश्रम : खरीप हंगाम जवळ आला आहे. मेहकर तालुक्यात सोयाबीन या पिकाचा पेरा जास्त असतो. शेतकरी घरचेच बियाणे जास्त प्रमाणात वापरतात. मात्र, हे बियाणे पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे महत्त्वाचे असते. याकरिता कृषी सहायकांकडून उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले आहे.

नियमांमुळे रोखता येईल तिसरी लाट

बुलडाणा : वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता तिसरी लाट येणार असल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे. परंतु प्रत्येकाने नियमांचे पालन केले, कोरोनाची त्रिसूत्री पाळली तर ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, असे आरोग्य विभागाचे मत आहे.

शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

बुलडाणा : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णांची संख्या कमी हाेत आहे़ लसीकरणाचा वेग वाढवल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे़ दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे़

महागाईमुळे शेतीकामे अडचणीत

दुसरबीड: शेतकऱ्यांची आता पूर्वहंगामी शेती मशागतीची कामे सुरू आहेत. परंतु महागाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने नांगरणी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या मशागतीकरिता बैलजोडी वापरणे शक्य नसल्याचे चित्र आहे़

खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाइनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे गावकऱ्यांना वर्गणी करून खासगी लाइनमनकडून वीजपुरवठ्याची कामे करून घ्यावी लागत आहेत.

सात-बारावर बोजा असल्याने अडचणी

हिवरा आश्रम: पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या सात-बारावर इतर खासगी वित्तीय संस्थांचा बोजा असल्याचे कारण सांगून त्यांना पीक कर्जापासून रोखण्यात येेते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पीककर्जापासून वंचित राहतो की काय, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

वर्षभरात ३२ बालविवाह रोखले

बुलडाणा: गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी, जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहे.

२७ रस्ते कामाची प्रतीक्षा

बुलडाणा: तालुक्यात ४० पैकी १३ पाणंद रस्त्यांचे काम झालेले आहे. उर्वरित २७ रस्ते कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणंद रस्त्याच्या कामासाठी एक किलोमीटरमागे साधारणत: ५० हजार रुपयांचा खर्च येतो.

बुरशीनाशक कल्चर यंत्र धूळखात

बुलडाणा: निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. त्यात बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळखात पडली आहे.