सरोवर काठावरील गणपती मंदिर परिसर, जुने विश्रामगृह, किन्ही गेट परिसरातही आंबटशौकीन दुपारी व संध्याकाळी दारूची मैफील जमवताना निदर्शनास येत आहे. परिसरात घाणीचे प्रमाण देखील वाढले आहे. अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागाकडे आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे २७ कलमान्वये लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश केल्यास गुन्हा आहे. या अभयारण्यातील सर्व परिसरात कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरीही मद्यपी बिनधास्तपणे मद्यप्राशन करताना निदर्शनास येत आहे. या मद्यपींना आवर कोण घालणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
लोणार सरोवर परिसर बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:35 AM