नवीन मोदे । लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : भारतीय खेडी, ग्रामीण जीवन तथा त्या भागातील विकासाची प्रक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी २३ वर्षीय ईवॉन फ्रेंच औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गावात पोहोचला असून, तेथे ग्राम परिवर्तनाचा दूत बनलेल्या सद्दाम खानसोबत १५ दिवस राहून ग्राम परिवर्तनाचा अभ्यास करणार आहे.लंडन येथे राहणार्या ईवॉनने नुकतीच ऑक्सफर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. भारतातील ग्रामीण जीवन अनुभवण्याच्या उद्देशाने तो भारतात आला. ग्रामीण भागात विकासाची प्रक्रिया महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन मिशनकडे संपर्क साधला. संबंधित विभागाने ईवॉन फ्रेंच यास सद्दाम खान काम करीत असलेल्या जांभळी गावात पाठविले. २८ जानेवारी रोजी ईवॉन फ्रेंच जांभळी गावात दाखल झाला. त्यामुळे सतत १५ दिवस तो सद्दाम खानसोबत राहून ग्राम परिवर्तनाचे निरीक्षण करणार आहे. त्यासाठी तो सद्दामसोबतच राहत असून, गावकरी सद्दामला मेस लावू देत नाहीत, त्यासोबतच ईवॉन फ्रेंचसुद्धा जांभळीवासियांच्या घरी जेवण करीत आहे. धामणगाव बढे येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने अतिशय दुर्गम व विकासापासून दूर असलेल्या जांभळी या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चार गावात चांगले काम केले. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी जांभळी गावाला भेट दिली तर राज्याचे अपर सचिव प्रवीणसिंग परदेशी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त संचालक उमाकांत दांगड या अभियानात मार्गदर्शन करीत आहेत.
लोकमतच्या वृत्तामुळे सद्दाम बनला स्टार समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानाची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी विविध घटकांची मदत घेतली. त्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, अमिताभ बच्चन यांसह उद्योग जगत पुढे आले. त्यासाठी प्रशासनातील मोठे अधिकारी परिo्रम घेत आहेत. या अंतर्गत धामणगाव बढे येथील युवक सद्दाम खान याने जांभळी गावात आपल्या कामाचा ठसा उमटविला. सद्दामची परिस्थिती तशी जेमतेम. वडील बसचालक होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. दोघे भाऊ बसचालक आहेत. सद्दामच्या कामगिरीची व अभियानाच्या यशाची बातमी २६ जानेवारी रोजी लोकमतने महाराष्ट्रात प्रसिद्ध केली आणि सद्दाम ‘स्टार’ बनला. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रातून मोबाइल खणखणत असल्याचे सद्दामने सांगितले. अनेकांनी आम्ही काही मदत करू शकतो का, याची विचारणा केली तर लोकमतची बातमी वाचून मोबाइलवर बोलताना आनंदाने अम्मीचे अo्रु थांबत नव्हते, ही गोष्ट माझ्या परिo्रमाला बळ देणारी असल्याचे सद्दामने सांगितले.
ग्राम परिवर्तनाची वाटचाल प्रेरणादायी आहे. येथील लोक खुप चांगले आहे. तर सद्दाम येथे खुप लोकप्रिय आहे. -ईवॉन फ्रेंच, लंडन