सुलतानपूर(जि. बुलडाणा), दि. ८- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १0 वीची परीक्षा सुलतानपूर येथील श्री शिवाजी हायस्कूल परीक्षा केंद्रावर ७ मार्चपासून सुरु झाली असून, परीक्षार्थी हे प्रथमच सीसी कॅमेर्याच्या नजरेखाली परीक्षा देत आहेत. लोणार तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग म्हणून नावारुपास आला आहे.सुरु असलेल्या १0 वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत इन कॅमेरा घेण्यात याव्या, असे परीक्षा बोर्डाचे आदेश यापूर्वीच प्राप्त झाले असल्याने संस्थाध्यक्ष सुदेश लोढे यांनी सदर आदेशाचे पालन करीत परीक्षांचा कारभार पारदश्री चालावा व ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वबळावर उत्तीर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत टिकला पाहिजे, या उदात्त हेतुने त्यांनी स्वखर्चातून ७0 हजार रुपये खर्च केले व शाळेच्या प्रत्येक खोलीत व परिसरात सीसी कॅमेरे बसविले. सध्या सीसी टीव्हीच्या देखरेखीत चालणारी येथील श्री शिवाजी हायस्कूल ही लोणार तालुक्यात एकमेव शाळा असल्याने पारदश्रीपणे चालणार्या शालेय कारभाराबाबत सर्व नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. १५९४ क्रमांक असलेल्या या परीक्षा केंद्रावर स्थानीय नॅशनल उर्द् हायस्कूलचे ५0, सिद्धेश्वर हायस्कूलचे १२२ व शिवाजी हायस्कूलचे १0९ असे २८१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्र संचालक म्हणून प्राचार्य सुनील सोळंके तर उपसंचालक म्हणून गजानन दुशितवार हे काम पाहत आहेत.
दहावीच्या परीक्षार्थींवर सीसी कॅम-याची नजर
By admin | Published: March 09, 2017 1:41 AM