रुग्णवाहिकेला या मिळतात सवलती
आरोग्यसेवेत रुग्णवाहिकेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्य सरकारने रुग्णवाहिकेला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे. रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी रुग्णवाहिकेला निळा दिवा व सायरन वाजविण्याची मुभाही आहे. वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नसते. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नसतो. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या जातात. मात्र, रुग्णवाहिका चालक याचा गैरफायदाच घेत असल्याचे पाहायला मिळते.
रुग्ण पळवणारी टोळी
शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील गेरसोयींची माहिती देऊन त्यांना खासगी रुणालयात पळविण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. यातून मिळणाऱ्या कमिशनच्या लोभापोटी काही खासगी रुग्णवाहिका चालक या कामात सक्रिय आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून औरंगाबाद, अकोला या ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेतून नेल्या जाते.
आरटीओच्या दरपत्रकाला विचारतो कोण?
परिवहन विभागाने वाहनाची क्षमता व प्रकारानुसार किलोमीटरसाठी दर ठरवून दिले आहेत, परंतु या दरपत्रकाला विचारतो कोण, हा प्रश्न आहे. खासगी रुग्णवाहिका चालक या दराच्या तीनपट दर आकारत असल्याच्या तक्रारी आहेत.
तक्रार कुठे करायची?
१. खासगी रुग्णवाहिकांविरुद्ध कुठे तक्रार करण्याचीही सोय नाही. त्यामुळे तक्रार कुठे करायची, हाच मोठा प्रश्न आहे.
२. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली, हेच मोठे भाग्य, असे म्हणून अनेक नातेवाईक रुग्णवाहिका चालकांनी आकारलेले भाडे कमी करत नाहीत किंवा त्या विषयी जास्त विचारपूसही करत नाहीत.
३. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर असते. त्यामुळे त्यांचे नातेवाईकही घाबरलेले असतात. परिणामी, नातेवाईक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.