काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर पुन्हा लग्नसमारंभ सुरू झाले. यामुळे काही प्रमाणात का होईना हास्य फुलले. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लग्नसमारंभावर प्रतिबंध आला आहे. लग्नकार्य उरकते घेतले जात आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरदेवाची मारुती मंदिरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जाते. काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी मिरवणुकीचे ५ ते १० हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते. परंतु कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला आहे.
कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर मोठे संकट आलेले आहे. लग्न समारंभ साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. त्यामुळे घोडा कोणी भाड्याने घेत नाही. त्यातच घोड्याचा चारा-पाण्याचा खर्च देखील खूप मोठा आहे. त्यामुळे आमची अवस्था खूपच वाईट झाली आहे.
धनराज पवार घोडा मालक पारध.