शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

शेगावातील लॉजवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:02 AM

शेगावात शनिवारी रात्री २0 ते २२ लॉज आणि हॉटेलवर डीवायएसपी पथकाने छापे मारले असता त्यामध्ये २८ तरुण व २४ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पो.स्टे.ला आणून तरुणांविरुद्ध ११0, ११७ ची कारवाई करण्यात आली, तर तरुणींना समज देण्यात आली. तसेच एका महिलेसह ५ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच जणांवर गुन्हे दाखल २८ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई २४ तरुणींना दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेगावात शनिवारी रात्री २0 ते २२ लॉज आणि हॉटेलवर डीवायएसपी पथकाने छापे मारले असता त्यामध्ये २८ तरुण व २४ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पो.स्टे.ला आणून तरुणांविरुद्ध ११0, ११७ ची कारवाई करण्यात आली, तर तरुणींना समज देण्यात आली. तसेच एका महिलेसह ५ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात व डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात रात्री ११.३0 वाजता पोलिसांच्या पथकांनी ठिकठिकाणी छापे मारून लॉज व हॉटेलची झाडाझडती घेतली. यामध्ये जवळपास २३३ जणांची तपासणी करण्यात आली. या छाप्यांमुळे शहरातील हॉटेल व लॉजधारकांमध्ये खळबळ माजली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत आढळलेल्या मुला-मुलींना पाहण्यासाठी पो.स्टे. बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. तर गाडगेबाबा चौकातील गोपाल गेस्ट हाऊसमध्ये मारलेल्या छाप्यात चिखली येथील तरुण व निमकर्दा येथील तरुणीस पकडण्यात आले. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ठिकठिकाणी देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी मिळून आल्याने डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गोपाल रमेश उमाळे, संजय मोहोड, भागवत किसन दांडगे हिवरा, चेतन दिलीप जामोदकर (वय २४) पारस व एक महिला यांच्या विरुद्ध अप नं. ४0६/१७ ३,४,५, स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार कायदा १९५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही गेस्ट हाऊस व लॉजवर मिळालेल्या २८ युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर २४ तरुणी, महिलांना समज देऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई करणार्‍या पथकांमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, कोळी, मोरे, शेख जावेद महिला पोलीस कर्मचारी चंदा शिंदे, निगरुण सोनटक्के, ज्योती धंदर, शेख अंजुम, संध्या ताठरकर, कोमल इंगळे यांच्यासह शेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील, पीएसआय तायडे, चौधरी, इंगळे आदींचा समावेश होता.