खामगाव : शहर आणि परिसरातील लम्पीग्रस्त जनावरांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे प्रशासकीय यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरात गत काही दिवसांपासून लम्पीग्रस्त जनावरे मोकाट फिरत असून, सोमवारी दुपारी नगर पालिका प्रशासकीय इमारती लगतच (जुन्या पालिका इमारती जवळ) एका लम्पीग्रस्त गोऱ्ह्याचा मृत्यू झाला.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसपासून खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराचा प्रकोप वाढता आहे. दरम्यान, शहरातील मोकाट जनावरांकडे पशुसंवर्धन विभाग आणि पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस खामगाव येथील पशु चिकित्सालयात एका लम्पी ग्रस्त वासराचा मृत्यू झाला होता. हे वासरू मृतावस्थेत तब्बल तीन दिवस तेथेच पडून होते. याबाबीवरून पशुसंवर्धन विभागाची लम्पी आजार निमुर्लनासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना दिसून आली. त्याचवेळी सोमवारी खामगाव नगर पालिका प्रशासकीय इमारती लगत (जुन्या पालिका इमारती जवळ) एका लम्पी ग्रस्त गोºह्याचा तडफडून मृत्यू झाला. परिणामी पशुसंवर्धन आणि पालिका प्रशासनाने अद्यापही लम्पी आजाराला गांभीर्याने घेतले नसल्याचे समोर येत आहे.
लम्पीग्रस्त गोऱ्हा आणून सोडला!
नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारती लगत एका लम्पीग्रस्त गोºहा तडफडत असताना पालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाºयांना दिसून आले. दुपारी ११ वाजता पासून तीनवाजेपर्यंत हा गोºहा तडफडत होता. मात्र, घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाचे कोणतेही पथक पोहोचले नव्हते. शेवटी या गोºह्याचा तडफडून मृत्यू झाला. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत हा गोºहा कुणीतरी आणून सोडल्याची चर्चा आहे.