खामगाव: लम्पी आजाराने मृत्यूमुखी पडलेले एक वासरू गत तीन दिवसांपासून खामगाव येथील तालुका पशू चिकित्सालयात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाधित जनावरे मोकाट असल्याचा प्रकार निस्तरत नाही तोच, पशुचिकित्सालयात मृत वासरू आढळून आल्याने पशुचिकित्सालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खामगाव आणि परिसरात गत काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रकोप वाढला आहे. मात्र, लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाकडे पशुवैद्यकीय प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असतानाच, खामगाव येथील पशुचिकित्सालयात उपचारासाठी आलेल्या एका वासराचा मृत्यू झाला. लम्पी आजाराने मृत्युमुखी पडलेले हे वासरू गत तीन दिवसांपासून पशु चिकित्सालयाच्या आवारातच पडून आहे. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत असलेल्या या वासराची दुर्गंधी सुटल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर खामगाव येथील पशु चिकित्सायलयाचे सहा. आयुक्त (पशुसंवर्धन) यांनी खामगाव पालिकेला तालुका लघु पशु चिकित्सालयासमोरील कचºयाबाबत २७ सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला आहे.
मृतवासराच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष!पशु चिकित्सालयात मृत्यूमुखी पडलेल्या मृत वासराची योग्य पध्दतीने विल्हेवाट न लावता. पशुसंवर्धन विभागाकडून तालुका लघु पशु चिकित्सालयाकडून नगर पालिका प्रशासनाशी कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कचºयामुळे रूग्णालयात येणाºयांना त्रास होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.