लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: घरच्या घरी शेतीचे मोजमाप सुरू असताना व शेतीची हिस्सेवाटी सुरू असताना मामाने हिस्सेवाटीच्या वादामुळे २६ वर्षीय भाच्याच्या छातीत चाकू भोसकल्याची घटना वकाना येथे १८ जून रोजी दुपारी ४.३0 वाजेदरम्यान घडली.तालुक्यातील वकाणा येथे मृतक अनुसया नामदेव निमकर्डे यांचे २ एकर शेत आहे. त्यांना वसंता नामदेव निमकर्डे, श्रीराम नामदेव निमकर्डे असे दोन मुले आहेत तर निर्मला गजानन दाते, शकुंतला रमेश बोंबटकार व कल्पना गजानन आमले या तीन विवाहित मुली आहेत. दरम्यान, अनुसया नामदेव निमकर्डे यांचा मृत्यू झाल्याने १८ जून रोजी सर्व जण शेतात हिस्सेवाटीकरिता एकत्र जमले तेव्हा शकुंतला रमेश बोंबटकार व तिचा मुलगा राजेश रमेश बोंबटकार रा. वडोदा पान्हेरा हेसुद्धा शेतात उपस्थित होते. यावेळी राजेश रमेश बोंबटकार हा शेतातील विहिरीजवळ पाणी पिण्यास गेला असता मामा श्रीराम नामदेव निमकर्डे हा विहिरीजवळ उभा होता. त्यावेळी श्रीराम निमकर्डे याने पत्नीच्या जवळ ठेवलेला चाकू घेतला व राजेश यांच्या छातीत भोसकला. जखमी राजेशवर प्रथम संग्रामपूर त्यानंतर वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून, अकोला येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसात गुन्हा दाखल नव्हता; मात्र घटनास्थळी तामगाव पोलीस रवाना झाले होते.
मामाने भाचाला सुरीने भोसकले!
By admin | Published: June 19, 2017 4:25 AM