- हर्षनंदन वाघबुलडाणा : अधिकृत नमूद प्रवासी भाड्यापेक्षा जास्त भाडे घेऊन मध्यप्रदेशातील परिवहन मंडळाद्वारा प्रवासी सेवा देत असलेल्या खासगी बसेस ग्रामीण भागातील प्रवाशांची लूट करीत आहेत. प्रवाशांना देण्यात येणाºया तिकिटावर अधिकृत भाडे नमूद न करता जास्तीचे भाडे नमूद करण्यात येत आहेत. याबाबत विचारणा केली असता, संबंधित वाहकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.बुलडाणा जिल्हा व मध्यप्रदेशची सीमा जवळच असल्यामुळे मध्यप्रदेशातील मध्यप्रदेश परिवहन महामंडळद्वारा खासगी पद्धतीने अनेक बसेस बुलडाणा जिल्ह्यात प्रवासी सेवा देत आहेत; मात्र या बसेसवर असलेले वाहक बुलडाणा जिल्ह्यातील प्रवाशांना मनमानी पद्धतीने तिकीट भाडे आकारून आर्थिक फसवणूक करीत आहेत. ५ जुलै रोजी एम.पी.६८, पी ०२०६ या क्रमांकाची मध्यप्रदेशातील बºहाणपूर डेपोची बºहाणपूर-जालना-खंडवा बस प्रवासी सेवा देत होती. यावेळी या बसमध्ये किशोर लोखंडे नावाचे वाहक होते. वाहक अधिकृत नमूद भाड्यापेक्षा प्रवाशांकडून जास्त भाडे आकारीत होते. याबाबत अनेक प्रवाशांनी वाहकांकडे तक्रारी केल्या. देऊळगावराजा ते चिखली दरम्यानचे ३५ किलोमीटरसाठी अधिकृत ७० रुपये भाडे असताना सदर वाहकाने ७५ रुपये आकारले. अशाच प्रकारे इतर प्रवाशांकडूनही सदर वाहकाने जास्तीचे पैसे आकारले. देऊळगावमही ते चिखली दरम्यान ३५ किलोमीटरचे भाडे ४५ रुपये होत असताना ५० रुपये तर देऊळगावराजा - बुलडाणा दरम्यान ८५ किलोमीटरचे एका ज्येष्ठ नागरिक महिलेकडून अर्धे भाडे ५५ रुपये होत असताना ७० रुपयांची आकारणी केली. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक महिलेला दिलेल्या तिकिटावर ७० रुपये ऐवजी खाडाखोड करून ६० रुपये करून तिकीट दिले; मात्र उर्वरित पैसे परत दिले नाहीत. अशा प्रकारे बºहाणपूर-जालना-खंडवा बसमधील वाहकाने प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली, याबाबत काही प्रवाशांनी सदर वाहकांना जाब विचारला व याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशातील बसच्या वाहकाची मनमानीबाबतची तक्रार कोणाकडे करावी, याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही माहिती नाही; मात्र प्रवाशांनी सदर बसमधील वाहक, बसचे मालक याबाबत माहिती घेऊन मध्यप्रदेशच्या परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार करू शकतात.- दीपक साळवे, बसस्थानक नियंत्रक, एसटी महामंडळ, बुलडाणा.