लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात काही पालिकांमध्ये महाआघाडी एकसंघ असताना शेगाव नगर पालिकेत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. महाविकास आघाडीतील फूट भाजपच्या पथ्थ्यावर पडत असून आगामी निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा तरी कसा? असा प्रश्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पडला आहे.शेगाव नगर पालिकेत २२ फेब्रुवारी रोजी नगर पालिका उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या सुषमा शेगोकार विजयी झाल्या. तर महाविकास आघाडीच्या शे. नईम यांना पराभव पत्कारावा लागला. शे. नईम यांच्या पराभवापेक्षा महाआघाडीतील फुटीच्या राजकारणाचीच चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. २८ सदस्य संख्या असलेल्या शेगाव पालिकेत भाजपचे सर्वाधिक १६ सदस्य आहेत. भाजपला शिवसेनेच्या ०४ पैकी तीन नगरसेवकांची ह्यसाथह्ण लाभली आहे. तर शिवसेनेचा एक नगरसेवक आघाडीचा धर्म पाळत आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा मुद्दा ऐरणीवर असताना शे. नईम यांची उमेदवारीसाठी मनधरणी करण्यात आली. पक्षनेतृत्वाचा निर्णय राखत नईम निकालाच्या परिणामाची चिंता न करता निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची जोरदार चर्चा आता पालिका वतुर्ळात रंगू लागली आहे. त्याचवेळी दोन सदस्य संख्या असलेल्या एमआयएममधील फुटीचाही मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. यामध्ये मो. वसीम पटेल तटस्थ होते. तर एका उमेदवाराने सत्ताधाºयांच्या बाजून उघड-उघड मतदान केले. एकंदरीत शिवसेना आणि एमआयएम मधील फुटी भोवतीच शेगाव पालिकेतील उपाध्यक्षपदाची निवडणूक फिरत असल्याचे आता दिसत आहे.
भारिपने पाळला आघाडी धर्म!नगर पालिका उपाध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एक नगरसेविका अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीच्या सोबतीला असलेल्या भारिप बहुजन संघाने आघाडी धमार्चे पालन करीत महाविकास आघाडीला साथ दिली. काँग्रेसच्या-०२, राष्ट्रवादीच्या-०३, भारिप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका अशा सात नगरसेवकांनीच महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.