शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मेहकरातील सामूहिक विवाह सोहळ्य़ांची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:16 AM

मेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सामूहिक विवाहाचे अनुदान हडपणार्‍यांना चाप बसणार आहे. 

ठळक मुद्देअनुदान लाटणार्‍यांना बसणार चाप!

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सामूहिक विवाहाचे अनुदान हडपणार्‍यांना चाप बसणार आहे. काही वर्षामध्ये अतवृष्टी, पावसाच्या कमी प्रमाणामुळे पिकांच्या उत्पादनात घट, पिकांना बाजारात भाव नसने, मजुरांना कामे न मिळणे यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता हैराण आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई अशा परिस्थितीत आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी अनेक गोर-गरीब व्याजाने पैसे घेऊन बँकेचे कर्ज काढून शेती विकून लग्न लावत होते. मुला-मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड गोर-गरिबांकडून वेळेवर होत नसल्यामुळे अनेकांनी आत्महत्याचा मार्ग अवलंबला होता. अशा परिस्थितीत गोर-गरीब नागरिकांना व शेतकर्‍यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून या सोहळ्याती वधू-वरांना शासनाकडून अनुदान देण्यात येते, तर ज्या संस्थेने सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असेल, त्या संस्थेलासुद्धा आर्थिक मदत देण्यात येते; मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी बोगस सामूहिक विवाह सोहळे घेऊन संबंधित अधिकार्‍यांना हाताशी धरून शासनाचे लाखो रुपये अनुदान लाटले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत; मात्र आता मेहकर तालुक्यात झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांची जिल्हा महिला बाल विकास विभागामार्फत चौकशी करण्यात येणार असून, बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणार्‍यावर कडक कारवाई होणार आहे, तसेच पात्र व खर्‍या लाभार्थींलाच लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रमोद एन्डोले यांनी दिली आहे.

या ठिकाणचे सोहळे चौकशीच्या फेर्‍यात मेहकर तालुक्यात १४ जुलै २0१७ रोजी सोनारगव्हाण, २२ जुलै २0१७ चिंचाली बोरे, २४ जून २0१७ रोजी हिवरा आश्रम ७ जुलै २0१७ रोजी नांद्रा-नजीक वर्दडी, ३0 मे २0१७ रोजी फ र्दापूर या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या सर्व सामूहिक सोहळ्याची जिल्हा महिला बाल विकास विभागामार्फत चौकशी होणार असून, चौकशी झाल्यानंतर जे खरे व पात्र वधू-वर असतील त्यांनाच शासनाचे अनुदान देण्यात येणार आहे, तर चौकशीअंती कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

ज्या संस्थांनी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले असतील व ज्या सामूहिक विवाह सोहळ्यात ज्या वधू-वरांनी लग्न केले असतील त्या सर्वांची चौकशी होऊन खर्‍या व पात्र लाभार्थींना शासनाचे अनुदान देण्यात येईल, तसेच दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.- प्रमोद एन्डोलेजिल्हा महिला बाल विकास अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपास