सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या ४२५ व्या जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी सूर्योदय समयी राजवाड्यात माँसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी महापूजा करण्यात आली. सोबतच २१ तोफांची सलामीही देण्यात आली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. सूर्योदय समयी राजे लखूजीराव जाधव यांचे वशंज व देऊळगांव राजा येथील बालाजी संस्थानचे विश्वस्त विजयसिंह राजेजाधव, पत्नी छाया यांच्यासह आडगांव राजा, मेव्हणाराजा, उमरद, किनगांव राजा,आदी वशंज शाखांच्या वतीने माँसाहेब जिजाऊंची महापूजा केली.
पारंपारिक वेशभुषेतील शाळकरी मुलांनी वेधले लक्षराजवाड्यात सूर्योदय समयीचे वातावरण अत्यंत अल्हाददायक होते. यातच स्थानिक आदर्श विद्या मंदिरच्या विद्यार्थानीं परिधान केलेली पारंपारिक वेशभुषा सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होती. या मुलांचे राजवाडयात आगमण होताच माँसाहेब जिजाऊ यांच्या घोषणांनी परिसर निनांदला. प्राचार्य सुभाष मोरे, संजय भुतेकर, प्रशांत मापारी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
फुलांची सजावट, हालगीचा ताल, टाळ मृदंगाचा निनाद सूर्योदय समयी माँसाहेब जिजाऊ यांचे पुजन करण्यात येत असतानाच राजवाडा परिसर रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. राजवाडयाच्या मधोमध चौकाध्ये कैलस वल्टे यांनी छत्रपती शिवाजी महाराजींची रांगोळीने अप्रतिमरित्या रेखाटली होती. ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यातच टाळमृदुंगाचा निनाद, हालगीचा मर्दानी ताल, आणि मंगल वाद्यांचे सुर यामुळे राजवाड्यातील वातावरण प्रसन्न झाले होते.
महापुजेनंतर मिठाई वाटपयासोबतच सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांचे वशंज शिवाजी राजे जाधव, संजय राजे जाधव , विठ्ठलराजे जाधव यांनी कुटुंब परिवारासह जिजाऊंचे पुजन केले. पुजनानंतर राजवाडयात मिठाई वाटप करण्यात आली.
नगराध्यक्षांनी केली सपत्नीक पूजानगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सतिश तायडे यांनी पत्नी शारदा यांच्या सह उपनागराध्यक्ष भिमा जाधव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थीतीत माँसाहेब जिजाऊंची विधिवत महापुजा केली. यावेळी खासदास प्रतापराव जाधव, पत्नी राजश्री जाधव, आमदार संजय रामुलकर, माजी मंत्री रणजीत पाटील, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, पत्नी डॉ. उषा खेडेकर, माजी नगराध्यक्ष विष्णु मेहेत्रे, पत्नी नंदाताई मेहेत्रे, गटनेते, सभापती,नगरसेवकांची यावेळी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या वतीने ११ जोडप्यांच्या उपस्थितीत झाली पूजामराठा सेवा संघाच्या वतीने ११ जोडप्यांनी माँसाहेब जिजाऊंची महापूजा केली. यावेळी गायल्या गेलेल्या जिजाऊ वंदनेने वातावरणात उत्साह संचारला होता. जिजाऊ सृष्टी येथील कार्यक्रम समन्वयक सुभाष कोल्हे , पत्नी अर्चना कोल्हे यांच्यासह जिजाऊ सृष्टीवरील पदाधीकारी, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, यांचे राज्य भरातील पदाधीकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडूनही अभिवादनस्थानिक प्रशासनाच्या वतीने प्रांतअधीकारी भुषन आहीरे, तहसिलदार सुनील सांवत, गटविकास अधिकारी डॉ. कृष्णा वेणीकर, नायब तहसिलदार डॉ. प्रविणकुमार वराडे, पंजाबराव ताठे, आदींनी उपस्थीत राहून माँसाहेब जिजाऊंना अभिवादन केले.माँसाहेब जिजाऊ यांच्या या महापुजेसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. लोकप्रतीनिधी म्हणून खासदर प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, शिवसेना नेते छगनराव मेहेत्रे, मंत्रालयीन सचिव सिध्दार्थ खरात, ॲड. नाझेर काझी, काँग्रेसचे मनोज कायंदे, सामाजिक कार्यकर्ते योगश म्हस्के, अतिश तायडे, बालाजी मेहेत्रे, गणेश झोरे, भिवसन ठाकरे, गौतम खरात, प्रविण गिते, प्राचार्य सुनील सुरुले सह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले.