ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सातही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता सध्या डॉक्टर, प्राध्यापक वकिलांमध्ये रेस सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये सिंदखेड राजा व जळगाव जामोद या मतदारसंघात तर थेट लढतच ‘डॉक्टर-डॉक्टर’ अशी होत आहे. मेहकर, मलकापूर व खामगावातही डॉक्टर, प्राध्यापक व वकिल निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता कोणत्या डॉक्टरचे इंजेक्शन ‘पॉवरफुल’ ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. निवडणुकीमध्ये उतरणाºया उमेदवारांमध्ये शिक्षणाचा अभाव ही मोठी समस्या असते. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात बहुतांश उमेदवार हे उच्च शिक्षित दिसून येत आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतक्याच उमेदवारांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंतचे झालेले आहे. मतदारराजाही आता सुज्ञ झाल्यामुळे उमेदवारांच्या शिक्षणाला महत्त्व देत आहे.
बुलडाणा मतदारसंघबुलडाणा मतदारसंघातील हर्षवर्धन सपकाळ हे बी.कॉम, बी. पी. एड् आहेत. तर विजयराज शिंदे बी. कॉम., योगेंद्र गोडे बी.एस.सी आहेत. तर संजय गायकवाड नववी झाले आहेत.चिखली मतदारसंघचिखली विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल बोंद्रे (बी. ई. सीव्हील) व श्वेता महाले (डी. फार्मसी) यांच्यात लढत होत आहे. इंजीनीअर आणि फार्मासीस्टची ही टक्कर सध्या मजेदार सुरू आहे.
मेहकर मतदारसंघमेहकर मतदारसंघामध्ये डॉक्टर, वकिल व प्राध्यापक रिंंगणात आहेत. शिवसेनेचे डॉक्टर रायमुलकर, काँग्रेसचे वानखेडे वकिल व वंचित बहुजन आघाडीचे वाघ हे प्राध्यापक आहेत.
सिंदखेड राजा मतदारसंघसिंदखेड राजामध्ये थेट लढत ‘डॉक्टर-डॉक्टर’ यांच्यामध्येच आहे. राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे व शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर हे आहेत. कोणत्या डॉक्टरचा इलाज काम कराणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
जळगाव जामोद मतदारसंघजळगाव जामोदमधील सामना दोन डॉक्टरांमध्येच रंगतदार ठरत आहे. त्यामध्ये भाजपचे डॉ. संजय कुटे व काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांचे शिक्षण बऱ्यापैकी आहे.मलकापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नितीन नांदुरकर हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. भाजपचे चैनसुख संचेती बीएससी व काँग्रेसचे राजेश एकडे हे बारावी झालेले आहेत.
खामगाव मतदारसंघखामगावमध्ये आकाश फुंडकर यांची वकिली आता कितपत काम करते हे महत्त्वाचे ठरत आहे. काँग्रेसचे ज्ञानेश्वर गणेश हे पाचवी, वंचित बहुजन आघाडीचे वसतकर बी. कॉम आहेत.