शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 2:41 PM

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र फेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.

Sindkhed Raja Assembly Constituency : बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघात  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र व्हायरल होतं आहे. मात्र आता सिंदखेड राजामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे पत्र खोटं असल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असून त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांची सही खोटी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र फेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. अधिकृत उमेदवार मनोज कायंदे यांना डावलून शिवसेनेचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र हे पत्र खोटं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने देत शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

"आमदार शिवाजीराव गर्जे यांची सही ही बनावट आहे. पत्रावर चुकीचा मजकूर टाकून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आपण विचलित न होता पूर्ण ताकदीने मनोज कायंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा बनावट पत्राची दखल घेण्याची आवश्यकता नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सिंदखेड राजामध्ये अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात आलेल्या राजेंद्र शिंगणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजेंद्र शिंगणेंच्या उमेदवारीने नाराज झालेल्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना तिकीट दिले आहे. 

पत्रात काय म्हटलं होतं?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिंदखेड राजा मतदार संघातून मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदार संघात शिवसेना पक्षातर्फे शशिकांत खेडेकर हे पण उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सूचनेनेनुसार पक्षाकडून सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचे (महायुतीचे) अधिकृत उमेदवार श्री. शशिकांत खेडेकर यांना पाठींबा जाहीर करण्यात येत आहे, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sindkhed-raja-acसिंदखेडराजाAjit Pawarअजित पवार