बुलडाणा: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदलाबुलडाणा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सुत्रांनी स्पष्ट केले. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे., रोजगाराच्या, कर संकलनाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यातच नोटबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्था दोलायमान झाल्याचे चित्र आहे. यावरून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी सीएए आणि एनआरसी सारखे मुद्दे बाहेर काढल्या जात आहे. ढासळत्या अर्थकारणामुळे देशाच्या राखीव पुंजीलाच हात घातल्या जात आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा बंद पुकारण्यात आला होता. त्यास बुलडाणा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बुलडाणा शहरात सकाळी वंचि बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बंदचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी प्रतिसाद देत बुलडाणा शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे, लघू व्यवसाय बंद केले होते. दुपार पर्यंत या बंदचा परिणाम चांगला जाणवत होता. त्यानंतर मात्र हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या बंदला जिल्ह्यात कोठेही हिंसक वळण लागलेले नाही. जिल्ह्यात हा बंद शांततेत पाळल्या गेल्या. दरम्यान, तामगाव पोलिस ठाण्यातंर्गत एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह्य पोस्ट फिरत असल्यामुळे या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा तामगाव पोलिस प्रसंगी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यातची शक्यता आहे. सोबतच जलंब पोलिस ठाण्यातंर्गतही काही नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेतपर्यंत या बंदला जिल्हयात समिश्र प्रतिसाद मिळाला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
Maharashtra Bandh : बुलडाणा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 5:04 PM