जळगाव जामोद: लोकसभेसाठी जळगाव जामोद शहरात गुरूवारी सकाळी पहिल्या एका तासात आमदार डॉ.संजय कुटे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.आमदार डॉ.संजय कुटे यांनी त्यांचे वडील श्रीरामजी कुटे, आई उमाताई कुटे, पत्नी अपर्णाताई कुट,े जेष्ठ बंधू अभियंता राजेंद्र कुटे, धाकटे बंधू अॅड.प्रमोद कुटे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी एकत्रितपणे सकाळी सव्वा आठ वाजता जळगाव जामोद शहरातील मतदान केंद्र क्रमांक ५७ मध्ये जाऊन मतदान केले. आमदार डॉ.संजय कुटे यांचे वडील श्रीरामजी कुटे यांना मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअर वरून नेण्यात आले. आमदारांव्यतिरिक्त पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी त्यांच्या पत्नी स्मितल पाटील व मुलासह मडाखेड येथे सकाळी पहिल्या तासातच मतदान केले.
मतदानापासून वंचित राहू नका!जळगाव जामोद शहराच्या प्रथम नागरिक सीमा डोबे यांनी त्यांचे पती कैलास डोबे यांच्यासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला. कोणीही मतदानापासून वंचित न राहता आपला हक्क बजावावा, असे आवाहन नगराध्यक्षा सीमा डोबे यांनी केले.
पहिले मत माजी आमदारांचे!जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र क्रमांक ६६ वर मतदानाचा हक्क बजवाला. त्यांनी त्या केंद्रावर सर्वात आधी मतदान केले.