शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra government : राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकरांना मंत्रीपदाची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:04 IST

डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

- नीलेश जोशीलोकमत विशेषबुलडाणा: महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि सहा मंत्र्यांचा २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले असून विश्वासदर्शक ठराव पारीत झाल्यानंतर प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे मंत्रीमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्याचे सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना जवळपास दहा वर्षे कॅबीनेट मंत्रीपदी काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांची दावेदारी ही अधिक प्रबळ आहे. शालेय शिक्षण, महसूल, क्रीडा, मदत व पुनर्वसन, माहिती व जनसंपर्क या राज्यमंत्रीपदासह आरोग्य खात्याचे कॅबीनेट मंत्रीपदाचा तगडा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे मंत्रीपद जवळपास निश्चित मानल्या जात आहे. गेली तीस वर्षे ते राजकारण सक्रीय असून लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ आणि २०१९ मध्ये पराभव होऊनही त्यांनी आपले जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व प्रकर्षाने अधोरेखीत केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय तथा निष्ठावान म्हणून ते ओळखल्या जातात. अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आलेल्या दोन आमदारांमध्येही ते जेष्ठ आहेत.दुसरीकडे पश्चिम वºहाडात शिवसेनेच्या असलेल्या तीन आमदारांमध्ये सर्वात अनुभवी व जेष्ठ असलेले मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचीही प्रसंगी मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अलिकडील काळात आ. डॉ. रायमुलकर आणि बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांचे शिवसेनेचे नेते तथा   मंत्रीपदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचे संबध असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यासोबत त्यांचा अलिकडील काळात वावर दिसून आला आहे. त्यामुळे प्रसंगी आ. रायमुलकर यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यास नवल वाटायला नको.

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेSanjay Raymulkarसंजय रायमुलकरbuldhanaबुलडाणाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार