लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : येथील एका २३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबत अमडापूर पोलिसांनी मुख्य आरोपीला २९ जून रोजी अटक केली.२३ वर्षीय विवाहित महिलेने १ जून रोजी अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिली होती की, ३० मे रोजी दुपारी १२ वाजता आरोपी प्रताप कौसे याने देवेंद्र इंगळे यांच्या घरामध्ये नेले व आरोपी श्याम रामचंद्र जुमडे रा.अमडापूर याने बलात्कार केला. या तक्रारीवरून अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७६ (५), ३४१, ३४२, ३६६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश भोसले यांनी या सुरू केला. यामध्ये प्रताप कौसे याने तात्पुरता जामीन मिळविल्याने मुख्य आरोपी श्याम रामचंद्र जुमडे याला २९ जून रोजी त्याचे घराजवळून आरोपीस ताब्यात घेवून अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता १ जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमेश भोसले करीत आहेत.