लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कृषिप्रधान देश असलेल्या भारतात खेड्यांना विशेष महत्त्व आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासात ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गावच्या भल्यासाठी मतभेद असले तरी मनभेद न होऊ देता एकोपा कायम ठेवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.
मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील मौजे पाडळी, जनुना, मढ, गुम्मी, तराडखेड, मासरूळ, कुलमखेड, सातगाव, डोमरुळ, धामणगाव व वरुड येथे त्यांनी भेट दिली.
ग्रामविकासासाठी मी सदैव तुमच्या सोबत असून सामाजिक, विधायक कार्यात सक्रियता कायम राखूया, असे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी देखील नव्या संकल्पना सांगितल्या. गावाच्या विकासाच्या बाबतीत चर्चादेखील पार पडली. चांगल्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही आश्वासन याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिले. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे व उप तालुका प्रमुख अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत उपरोक्त गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो:
-----------