- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गव्हाचे नियतन कमी करून भरड धान्य म्हणून मका जिल्ह्यातील ४३ हजार २७१ विविध कार्ड धारकांच्या माथी मारण्याचे पुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत. ज्वारी आणि मक्याचे वाटप ज्या प्रमाणात करावयाचे आहे. त्याप्रमाणात गव्हाचे नियतनकमी करण्याचे शासन परिपत्रकात नमूद आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात भरड धान्य म्हणून सरसकट मका वितरणासाठी नियतन देण्यात आले. तसे परमीटही मंजूर करण्यात आल्याने लाभार्थी आणि स्वस्त: धान्य दुकानदारांमध्ये रोष व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मका खाणाºयांचे प्रमाण नगण्य असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत सरसकट मका वितरणामुळे जिल्ह्यात आगामी काळात उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.रब्बी पणन हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केलेल्या भरडधान्याचे लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वाटप करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेत. यासंदर्भात सहसचिव मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने २२ जुलै रोजी एक परिपत्रक जारी केले. यामध्ये ज्वारी व मका खरेदीवर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील खरेदी अधिकारी यांच्याद्वारे नियंत्रण ठेवून अभिकर्ता संस्थामार्फत खरेदी केलेल्या ज्वारी व मका जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याद्वारे गोदामात तात्काळ जमा करून घ्यावा, तसेच प्रमाणपत्र अभिकर्ता संस्थेस द्यावे, तसेच खरेदीची अद्यायावत आकडेवारी तात्काळ शासना सादर करण्याचे निर्देश दिलेत.अभिकर्ता संस्था आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आकडेवारीत तफावत आढळणार नाही, याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांवर निश्चित करण्यात आली.
त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात खरेदी झालेला मका भरड धान्य म्हणून लाभार्थ्यांच्या माथी मारण्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत. भरड धान्य म्हणून मक्याचे सरसकट वितरण करणे अतिशय चुकीचे आहे. सरसकट मका वितरणामुळे लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका लाभार्थ्यांसोबतच स्वस्त धान्य दुकानदारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.- आ. अॅड. आकाश फुंडकरजिल्हाध्यक्ष,
भाजपशासकीय परिपत्रकात गव्हाचे नियतन कमी करून मका वाटप करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. परंतू सद्यस्थितीत सरसकट मका वितरणाचे प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात मका खाणाºयांचे प्रमाण अत्यल्प असल्याने वितरण व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
- राजेश अंबुसकरजिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक संघटना, बुलडाणा.
गव्हाचे नियतन कमी करून लाभार्थ्यांना सरसकट मका वितरणासाठी नियतन प्राप्त झाले आहे. वाटप करण्यासाठी परमीटही आले आहे. सरसकट मका वितरणासाठी स्वस्त: धान्य दुकानदारांचा विरोध असून, तशा आशयाचे निवेदनही संघटनेने वरिष्ठ स्तरावर दिले आहे.- व्ही.एम.भगततालुका पुरवठा अधिकारी, खामगाव.