- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात माहे आॅगस्टच्या धान्याचे वाटप करण्यात आले आहे. अंत्योदय, शेतकरी आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना गव्हाऐवजी मक्याचे वितरण झाल्याने नाराजीचा सूर उमटत असतानाच, तांदळाप्रमाणेच मका विक्रीच्या गोरखधंद्याने जिल्ह्यात डोकेवर काढल्याचे चित्र आहे.बारदाण्यामुळे रेशनचे तांदूळ ओळखने सुलभ असल्याने जिल्ह्यात दीड हजार क्विंटल काळ्याबाजारात जाणारे तांदूळ जप्त करण्यात आले; मात्र मक्यासाठी अशी कोणतीही ओळख ग्राह्य धरता येत नाही. मक्याचा बारदाना हा सामान्य असल्यामुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा मका ओळखणे अवघड होत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून गव्हाऐवजी आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर या तिन महिन्यांच्या कालावधीत गव्हाऐवजी मक्याचे वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना मक्याचे नियतन वितरीत करण्यात आले. पासींगही देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी आॅगस्ट महिन्याचे धान्य वाटप पूर्ण झाले आहे. त्याचवेळी काही तालुक्यांमध्ये धान्य वितरण सुरू आहे.
मोफत गव्हाचे वितरण प्रभावित!ंजिल्ह्यातील १३ तालुक्यातील १६ गोदामांमध्ये मक्याची मोठी साठवणूक करण्यात आली आहे. परिणामी, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत मोफत वितरीत केल्या जाणाऱ्या गव्हाची साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खामगाव, देऊळगाव राजा, लोणार, चिखली, मेहकर, मलकापूर आणि नांदुरा येथे मोफत गव्हाचे वितरण प्रभावित झाले आहे. यासंदर्भात गोदाम पालकांनी वाहतूक प्रतिनिधींना गव्हाचे वाटप ‘तात्पुरते बंद’ ठेवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.रेशनच्या धान्याचाही जिल्ह्यात काळाबाजारजिल्ह्यात रेशनच्या धान्याचाही काळा बाजार होत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळात असे प्रकार समोर आले आहेत. ग्रामीण भागातून प्रामुख्याने रेशनचे धान्य गोळा केल्या जात असल्याची ओरड आहे. जिल्ह्यात अलिकडील काळात ५१ क्विंटल गहू व ९७३ क्विंटल तांदुळही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यातील नऊ गुन्हे हे प्रामुख्याने खामगाव-शेगाव तालुक्यातील आहे. जिल्ह्यातएक रॅकेटही सक्रिय असल्याची चर्चा आहे.
तांदळाच्या विक्रीचे ९ गुन्हे दाखल!रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करताना खामगाव-शेगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ०९ गुन्हे दाखल झाले आहेत. जवळपास एक हजार क्ंिवटल तांदूळ जप्त करण्यात आला. मात्र, बारदाण्यामुळे मक्याची ओळख पटविणे अशक्य असल्याने काळ्या बाजारात जाणारा मका रोखण्यात पुरवठा विभागाला अपयश येत असल्याची चर्चा आहे.