लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऊसाला एफआरपी किंवा ७०/३० च्या फॉर्मुल्यानुसार भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चिरडुन काढण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्या वर अमानुषपणे लाठीचार्ज करुन गोळीबार केला. या घटनेच्या निषेध करीत सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील गंगामाई व संत एकनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या ऊसाला एफआरपी किंवा ७०/३० च्या फॉर्मुल्यानुसार भाव द्यावा या मागणीसाठी शेवगांव तालुक्यातील खानापूर, गोटन येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यानी १४ नोव्हेंबर रोजी शेवगांव ता. पैठण हा राज्यमहामार्ग अडवून आंदोलन केले. हे आंदोलन पोलीसांनी चिरडुन काढण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावर १५ नोव्हेंबर च्या सकाळी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यानी पुन्हा एकत्र येवून आंदोलन सुरु केले. मात्र पोलीसांनी दुपारी पुन्हा आंदोलन कर्त्यांची धरपकड करुन शेतक-यांवर गोळीबार केला. यात भगवान मापारी व बाबुराव दुकाळे हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. पोलीसांनी शेतक-यांच्या ऊसाच्या भावाचा प्रश्न सोडविण्या एवजी शेतक-यांवरच अमानुसपणे शेतक-यांवर गोळीबार करुन हे आंदोलन चिरडुन काढले. या घटनेचा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना तिव्र शब्दात निषेध करुन झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन दोषींविरुध्द कडक कारवाही करावी अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख यांनी दिला. निवेदन देतांना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, पंकज शेजोळे, पंकज उबरहंडे, राम अंभोरे, शिवा राऊत, चंद्रशेखर देशमुख, मयुर देशमुख, प्रतिक उबरहंडे हे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 7:15 PM
अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चिरडुन काढण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्यावर अमानुष लाठीचार्ज करुन गोळीबार केला. या घटनेच्या निषेध करीत सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली
ठळक मुद्देस्वाभिमानी विद्यार्थी संघटनेची मागणीआंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी केला होता अमानुष लाठीचार्ज व गोळीबार