शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:32 AM

बुलडाणा : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आराेग्य विभागाने मान्यता दिली असून आता अंतिम टप्यातील मान्यतेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत ...

बुलडाणा : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आराेग्य विभागाने मान्यता दिली असून आता अंतिम टप्यातील मान्यतेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत येत्या काळात हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, बऱ्याच कालवधीपासून रखडलेल्या बुलडाण्यातील या वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पहिला टप्पा मार्गी लागला आहे.

दुसरीकडे बुलडाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जवळपास ४५० काेटी रुपये खर्च अपेक्षित असून गेल्या आठवड्याभरापूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी आराेग्य मंत्री ना. राजेश टाेपे यांच्याशी सविस्तर चर्चा केली हाेती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय महाविद्यालयाचा मार्ग आता जवळपास माेकळा झाला आहे.

जालना, बुलडाणा, परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पुढे ते म्हणाले की मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.

हिंगोली, गडचिरोली जिल्हेही महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अशा जिल्ह्यांना थोडे थांबावे लागेल. कारण एका ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे झाल्यास सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. अर्थसंकल्पात एवढी आर्थिक तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे जवळ वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जिल्ह्यांनी थोडे थांबावे, जिल्हा रुग्णालयांत अधिक सुविधा द्याव्यात, असा विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कधी ठेवायचे आदींवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात किती नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही ना. टोपे म्हणाले.