शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 10:27 AM

Government Medical College at Buldana मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री  ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आराेग्य विभागाने मान्यता दिली असून आता अंतिम टप्यातील मान्यतेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत येत्या काळात हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, बऱ्याच कालवधीपासून रखडलेल्या बुलडाण्यातील या वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पहिला टप्पा मार्गी लागला आहे. दुसरीकडे बुलडाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जवळपास ४५० काेटी रुपये खर्च अपेक्षित असून गेल्या आठवड्याभरापूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी आराेग्य मंत्री ना. राजेश टाेपे यांच्याशी सविस्तर चर्चा केली हाेती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय महाविद्यालयाचा मार्ग आता जवळपास माेकळा झाला आहे.  जालना, बुलडाणा, परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री  ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पुढे ते म्हणाले की मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.हिंगोली, गडचिरोली जिल्हेही  महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत  मात्र अशा जिल्ह्यांना थोडे थांबावे लागेल. कारण एका ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे झाल्यास सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. अर्थसंकल्पात एवढी आर्थिक तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे जवळ वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जिल्ह्यांनी थांबावे, जिल्हा रुग्णालयांत अधिक सुविधा द्याव्यात, असा विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कधी ठेवायचे आदींवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर किती नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, याचा   निर्णय घेतला जाईल, असेही ना. टोपे म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRajesh Topeराजेश टोपे