तत्कालीन कर्जमाफीचा मलिदा काँग्रेस-राकाँने लाटला - श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:38 AM2017-11-10T00:38:03+5:302017-11-10T00:39:28+5:30
गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्वेता महाले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २00८ मध्ये फसवी कर्जमाफी करून शेतकर्यांची दिशाभूल केली होती. तेव्हाच्या कर्जमाफीचा मलिदा आघाडी सरकारच्या भागीदार असलेल्या दोन्ही काँग्रेसनी व त्यांच्या हितसंबंधीयांनीच लाटला. बँकांनीसुद्धा या धामधुमीत आपले उखळ पांढरे करून घेतले. तर तेव्हाच्या कर्जमाफीच्या लाभापासून गोरगरीब शेतकरी वंचित राहिला होता, या गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. पात्र शेतकर्यांचा सात-बारा कोरा होणारच आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्वेता महाले यांनी केले आहे.
गत काही दिवसांपासून चिखली बाजार समितीचे संचालक मंडळ व जि.प. सभापती श्वेता महाले यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. या पृष्ठभूमीवर महाले यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, भाजपा सरकारने शेतकर्यांना दिलेला शब्द हमखास पूर्ण होणार आहे. कर्जाच्या खाईत पडलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक गरीब व पात्न शेतकर्याचा सात-बारा कोरा होऊन येत्या खरीप हंगामासाठी त्यांना पीक कर्ज मिळणारच आहे, तरी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडून शेतकरी बांधवांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार करून छत्नपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २0१७ सुरू केली. या योजनेद्वारे राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे सुरू आहे. यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने शब्दच्छल करून काही शेतकर्यांना वगळले होते. त्यामध्ये कोरडवाहू शेतकर्यांचा भरणा मोठय़ा प्रमाणात होता. या शेतकर्यांनादेखील भाजपा सरकारने कर्जमाफीत सामावून घेत दिलासा दिला आहे.
असे असताना तालुक्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कर्जमाफीविषयी जनतेमध्ये संभ्रम व गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करीत महाले यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार- प्रसार व जनतेपर्यंंत लाभ पोहचवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते; परंतु त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याची टीकादेखील केली आहे. तर जिल्हय़ातील शेतकर्यांच्या खात्यात सुमारे ६0 कोटी रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात जमा झाले आहेत. येत्या काळात या रकमेत आणखी वाढ होईल, अशी माहितीदेखील महाले यांनी दिली असून, पुढील खरीप हंगामात शेतकर्यांना नव्याने पीक कर्ज मिळणार असल्याचा विश्वास महाले यांनी व्यक्त केला आहे.