मालकपूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ 'होम क्वारंटीन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 2:38 PM
मालकपूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ 'होम क्वारंटीन' झाले आहेत.
मलकापूरः येथे आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाचा संपर्क मलकापूरचे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्या अंगाशी आला. त्याच कारणावरून त्यांना गुरुवारी रात्री बोदवड रस्त्यावरील चव्हाण फार्म हाऊसध्ये"क्वारंटीन"करण्यात आल्याचे आज शुक्रवारी उघडकीस आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मलकापूरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कमालीची दहशत पसरली आहे. प्रशासनाने त्या रुग्णाच्या घर असलेल्या बद्रि काँम्लेक्सच्या चारही बाजूंनी ५०० मिटर परिसर सील केला आहे. त्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने मलकापूरचे नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांना काल गुरुवारी रात्री "क्वारंटीन" केले आहे. त्यांना बोदवड रस्त्यावर असलेल्या दडाच्या मारूती मंदिराजवळील चव्हाण फार्म हाऊसध्ये ठेवण्यात आले आहे.या प्रक्रीयेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना हातावर शिक्के मारून आयसोलेटेड करण्यात आले आहे. यामुळे त्यांचा लोकांशी संपर्क होवू नये. या आरोग्य विभागाच्या निकषांवर नगराध्यक्ष रावळ यांना 'क्वारंटीन" करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या. समर्थकत कमालीची अस्वस्थता पसरली आहे.अर्थात रावळ कुठल्याही घटनेत मदतीला पुढे असतात यावेळी नेमका हाच पवित्रा त्यांच्या अंगाशी आला आहे. यासंदर्भात चौकशी केली असता १४ दिवस त्यांना "क्वारंटीन" प्रक्रियेत रहावे लागेल असे सूत्रांनी सांगितले आहे(तालुका प्रतिनीधी)