हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की सन १९७८ साली धोपेश्वर येथून कार्यान्वित वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. तांत्रिक अडचणीमुळे पूर्णामायच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर आधारित या योजनेत अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठीच्या झळा स्थानीय नागरिकांनी सोसल्या. गेली २0 वर्षे पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा पाणी पुरवठा देवा देवा करीत नियंत्रणात आला आहे. फेब्रुवारी १६ पासून चौ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारण ११.५0 कोटींच्या पाइपलाइनचा वापर सुरू झाला आहे.विद्यमान परिस्थितीत आलबेल चालू असताना फेब्रुवारीच्या मध्यावधी तच हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक माहिती आहे. म्हणजे ३८८ द.ल.घ.मी. क्षमतेच्या धरणात मृतसाठा वगळता केवळ २१0 द.ल.घ.मी एवढा जलसाठा आहे. विशेष म्हणजे या धरणावरच खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील ३२ मुख्य योजनांसह लहान-मोठय़ा योजना कार्यान्वित आहेत. त्यात रेल्वे, वीज प्रकल्प, साखर कारखाने, नगरपालिका, एमआयडीसी, ग्रामपंचायती यांचा सामवेश आहे. याच धरणावरून हजारोंच्या संख्येने अवैधरीत्या पाणी उपसादेखील करण्यात येतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच ६0 टक्क्यांवर आलेला जलसाठा किती काळ पुरणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पर्यायाने पाण्याचे बाष्पीभवन आणि उपसा अशा दोन प्रक्रियेत ‘त्या’ जलसाठय़ात घट येण्याची शक्यता आहे. परिणामी, बॅकवॉटरची पातळी लक्षवेधी स्वरूपात कमी होऊन मलका पूरच्या एक लाख लोकांसाठीची पाणी पुरवठा योजना येत्या दोन महिन्यांत संकटात येण्याचे संकेत आहेत. त्यावर उपाययोजनेची गरज त्यानिमित्ताने प्रतिपादित होताना दिसत आहे.
ग्रामीण भागालाही झळ!मलकापूर तालुक्यात २२ गाव नळ योजना, वडोदा ५ गाव नळ योजना, एमआयडीसी आदीसह विविध योजना हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर आधारित आहेत. पर्यायाने सव्वालाख नागरिक त्या माध्यमातून अडचणीत येण्याची भीती असून, ग्रामीण भागालाही त्यांच्या झळा बसण्याचे संकेत आहेत.
अवैध उपशावर कारवाई व्हावी!हनतूर धरणाच्या जलसाठय़ातून मलकापूर पा.पु. योजनेपर्यंतच्या ११ कि .मी. अंतरात शेकडो ठिकाणी पाण्याचा अवैधरीत्या उपसा केला जात आहे. त्यावर अवैध पाणी उपसा समितीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
विद्यमान परिस्थितीत हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्या उ पाययोजनांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या-ज्या ठिकाणी सध्या समस्या येत आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. अडचण येऊ नये, आम्ही कार्यरत आहोत.- एस.आर.पाटील, सहायक अभियंता हतनूर प्रकल्प.
पाण्याअभावी मलकापूरकरांनी काय सोसलंय याची जाण आणि भान आम्हाला आहे. त्यासाठीच आम्ही नवीन पाइपलाइनवर भर देऊन पाणी पुरवठा आटोक्यात आणला. सद्यपरिस्थिती चांगली दिसते; मात्र येणार्या काळात अडचण येऊ नये म्हणून हतनूर धरणाच्या पाण्यावर आरक्षणाच्या रकमा भरल्या आहेत. जनतेने पाण्याचा योग्य वापर करावा, अशी आमची विनंती आहे.- अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर.