लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी शहरातील महावितरणच्या कार्यालयात केली. महावितरणचे सहायक अभियंता राजेश मनसुटे (वय ३२, रा. जनुना ता. खामगाव) आणि तंत्रज्ञ नीतेश शंकर सनिसे (वय ३३, रा. वडनेर भोलजी, ता. नांदुरा) यांनी ५ फेब्रुवारी रोजी एका ग्राहकाच्या घरातील मीटर फॉल्टी दाखवले. याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असा दबाव आणून कारवाई टाळण्यासाठी ३0 हजार रुपये लाच मागितली. दुसर्या दिवशी सकाळी पैसे मिळाल्यानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ग्राहकाने एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. मंगळवारी एसीबीच्या जाळ्य़ात सहायक अभियंता व तंत्रज्ञ अडकले.
मलकापूर : सहायक अभियंत्यासह तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्य़ात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:15 AM
मलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी शहरातील महावितरणच्या कार्यालयात केली.
ठळक मुद्दे३0 हजार रुपये लाचेची केली मागणी; रंगेहात पकडलेवीज चोरीचा गुन्हा दाखल न करणे भोवले