लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. भारत सरकारच्या सुरक्षा विभागात सीआयएसएफमध्ये कार्यरत सागर मुगुतराव वाकोडे रा.पान्हेरा खेडी ता. मोताळा आज गुरुवारी त्यांची बुलेट क्र. एम.एच.२0/ सीएल २0२0 या दुचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. ११.१५ वाजेच्या सुमारास पाचपांडे पेट्रोल पंपानजिक विरुद्ध दिशेने भरधाव आलेला ट्रक क्र.एम.पी. १३ एचजी 0४४५ याने बुलेटला धडक दिली. या अपघातात जवान सागर वाकोडे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, पत्रकार गजानन ठोसर यांनी त्यांना कोलते हॉस्पिटललात हलविले. डॉ.गौरव कोलते यांनी जखमीवर तातडीने उपचार सुरू केले.
मलकापूर : ट्रकच्या धडकेत सीआयएसएफ जवान गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:53 IST
मलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले.
मलकापूर : ट्रकच्या धडकेत सीआयएसएफ जवान गंभीर जखमी
ठळक मुद्दे राष्ट्रीय महामार्ग ६ वर पाचपांडे पेट्रोल पंपानजिक घडला अपघातजवानाची प्रकृती चिंताजनक