लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसात थकीत बिलापोटी तालुक्यातील खामखेड शिवारातील डी.पी.बंद करण्यात आल्या. त्यात नव्याने बसविण्यात आलेल्या डीपींचाही समावेश आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता, बिल न पाठवता कारवाई झाल्याने सोमवारी गावकर्यांनी अँड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती गावकर्यांनीच दिली.दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुरा -ढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा व रब्बीच्या पिकांच्या प्रश्नावरून अँड.हरीश रावळ, राजू पाटील, सरपंच विजय पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, जाकीर मेमन, जावेद कुरेशी, नीलेश चोपडे, राजू नेवे, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर निकम यांच्यासह संतप्त गावकर्यांनी जांबुळधाबा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून संतप्त जमावाने कार्यालयाची तोडफोड करून साहित्याची जाळपोळ केली. या आंदोलनात नामदेव पाटील, हरिभाऊ कुयटे, सदानंद कुयटे, विनोद कुयटे, शिवाजी ठोंबरे, सुभाष पुंडे, बाबूराव पेसोडे, बाबूराव होनाळे, शालीग्राम पाटील, नवृत्ती अमृत, जितु कुयटे, शेषराव कुयटे, शालीग्राम कुयटे, एकनाथ डाबरे, प्रकाश कुयटे, गणसिंग निकम, डॉ.चव्हाण, दशरथ कुयटे यांच्यासह अनेक गावकरी सहभागी होते. वीज वितरण कंपनीच्या जांभुळधाबा उपकेंद्रांतर्गत येणार्या गावांचा वीज पुरवठा सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अँड.हरीश रावळ यांनी यावेळी दिला. त्यावर एका तासात महावितरणच्या वरिष्ठांनी तत्काळ वीज कर्मचारी पाठवून वीज पुरवठा पूर्ववत केला, अशी माहिती सरपंच विजय पाटील यांनी दिली.
मलकापूर : महावितरणच्या जांभूळधाबा येथील कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:04 AM
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसात थकीत बिलापोटी तालुक्यातील खामखेड ...
ठळक मुद्देवीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संतप्त हरीश रावळ यांच्या नेतृत्वात आंदोलन