लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे. अर्थात प्रथमदर्शनी त्यात पैशांची बचत दिसत असली तरी ही प्रक्रिया अवैध असल्याने वाहनधारकांच्या जिवावर बेतणारी असून संबंधीत प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिवसंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यापासून सुटका व्हावी याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना पुढे येत आहेत. त्याच धरतीवर अवैध गॅस रोपणाचा व्यवसाय मलकापुरात बोकाळल्याची माहिती असून तीनचाकी व दोन चाकी वाहनधारकांचा त्याकडे कल वाढला आहे.प्रामुख्याने अँपे, ऑटोरिक्षा व दोनचाकी वाहनांचा त्यात समावेश आहे. त्या प्रक्रियेत वाहनांना अवैधरित्या गॅस किट लावली जाते. त्याद्वारे घरगुती वापराच्या सिलेंडरमधून काही ठिकाणी गैस भरुन दिला जातो. ६0 रुपयांचे गॅसमध्ये कमीत ९0 ते १00 कि.मी.ची हमी संबंधितांकरवी घेतली जाते. शहरात चार ते पाच ठिकाणी गॅस भरुन दिला जातो. तर दोन, तीन ठिकाणी गॅसकिट लावली जाते.चालकांशी संवाद साधल्यानंतर हे वास्तव पुढे आले आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे. गॅस वापरातून पैशाची बचत होत असली तरी ही प्रक्रिया अवैधरित्या असल्याने कुठल्याही क्षणी संबंधित वाहनधारकांच्या जिवावर बेतू शकते. अवैधरित्या घरगुती वापराच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे.
टोळी सक्रीयअवैध गॅस रोपणाचा व्यवसाय मलकापुरात बोकाळल्याची माहिती असून तीनचाकी व दोन चाकी वाहनधारकांचा त्याकडे कल वाढला आहे.प्रामुख्याने अँपे, ऑटोरिक्षा व दोनचाकी वाहनांचा त्यात समावेश आहे.
अवैध गॅस रोपणाच्या व्यवसायाविषयी आमच्या संघटनेकडेही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत चौकशी करीत आहोत. लवकरच त्याविषयी तक्रार करुन संबंधि तावर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत.- अजय लक्ष्मण टपप्रदेशसंघटक आझाद हिंद संघटना