लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बोटीद्वारे अवैध उपसा उत्खनन केलेला दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई आज ४ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या पथकाने मौजे काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्र परिसरात केली.मौजे काळेगाव शिवारातील गट नं.१२ चे शेजारी पूर्णा नदीपात्रातून विनापरवानगी बसवलेल्या स्वयंचलित बोटीद्वारे अवैध उपसा करून रेतीसाठा उत्खनन सुरू असल्याची बाब महसूल प्रशासनाला समजली. त्याचप्रमाणे बोटीतून होत असलेल्या गौण खनिज चोरीप्रकरणी लाखो रुपयांची होतेय उलाढाल, या मथळ्याखाली ३१ डिसेंबर रोजी लोकमतने दखलपात्र वृत्तही प्रकाशित केले होते. त्यामुळे महसूल प्रशासन अधिक सजग झाले होते.परिणामत: आज दुपारी तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, मंडळ अधिकारी पी.के.पाटील, तलाठी बी.के.जाधव, एस.जी. पारस्कर या चमूने काळेगाव परिसरात धाड टाकून दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची धाडसी कारवाई केल्याने वाळू माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
अखेर महसूल विभाग कारवाईसाठी सरसावला!सरत्या वर्षात ३१ डिसेंबर रोजी अवैध गौण खनिज उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित झाले. ‘त्या’ व्यवसायिकात एकच खळबळ उडाली. त्यामुळे कारवाईच्या धाकामुळे व्यवसाय दोन दिवस बंद होता; मात्र पुन्हा सुरू करण्यात आल्याने महसूल विभाग कारवाईसाठी सरसावल्याचे सांगितले जाते.
जिल्हाधिकार्यांनी पाठबळ द्याव!पूर्णेच्या पात्रातून अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन संबंधित गावकर्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेतणार असेच आहे. स्थानीय अधिकारी हिंमत करतात. त्यांना कर्तव्यदक्ष जिल्हाधिकार्यांनी पाठबळ द्यावं जेणे करून अवैध काम बंद होऊ शकेल, असा सूर जनतेत उमटत आहे.
भागिदारीसाठी पुढार्यांची चढाओढ!अवैध गौण खनिज उत्खननात रग्गड पैसा मिळतो, या धरतीवर या व्यवसायात ऑफ द रेकॉर्ड भागिदारीसाठी पुढार्यांची जणू काही चढाओढच लागल्याचे चित्र मलकापूर परिसरात आहे. लोकप्रतिनिधीही त्यांना पाठीशी घालतायेत, हे विशेष.