मलकापूर: येथील एका नवविवाहितेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली.शहरातील भीम नगर येथील सागर पंजाबराव वाकोडे यांचे २८ जून २०१९ रोजी सुरत येथील करिश्मा वाकोडे नामक तरुणीशी झाला होता. तर लग्नानंतर ही नवविवाहिता आपल्या माहेरी गेली. दरम्यान, पत्नीला परत आणण्याकरिता सागर वाकोडे हे सुरत येथे गेले. त्यावेळी सहल म्हणून नातेवाईक आणि काही जणांसोबतच ते सुरत येथील धुम्मस बीचवर गेले. या ठिकाणी फिरत असताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौ. करिष्मा वाकोडे व अश्विन कटाळे (बोदवड)यांचेसह त्यांच्यासमवेत असलेले पाच ते सहाजण पाण्यामध्ये बुडाले.ही बाब तेथे असलेल्या अन्य नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी बुडणाऱ्यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र नवविवाहित करीष्मा ही आढळून आली नाही. तेव्हा बुडणार्यांपैकी अश्विन कटाळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तर करिश्मा चा शोध घेतला असता तिचा मृतदेह दुसºया दिवशी दुपारी गोल्डन बीच हनुमान मंदिर परिसरात आढळून आला. या घटनेने मलकापुरातील सासर असलेल्या वाकोडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.(प्रतिनिधी)
मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:17 PM