लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. भाराकाँ जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शासनविरोधी घोषणा देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकर्यांच्या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचचे शेकडो कार्यकर्ते ४ रोजी जाब विचारण्यासाठी निघाले असता, त्यांना अकोल्यात पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्याच्या निषेधार्थ व आंदोलनकर्त्यांच्या सर्मथनार्थ आ.राहुल बोंद्रे, माजी आ.वसंतराव शिंदे, अँड.साहेबराव मोरे, पक्षनेते डॉ.अरविंद कोलते, पीरिपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, प्रहार संघटनेचे संभाजी शिर्के, माजी नगराध्यक्ष श्यामकुमार राठी आदींनी मलकापूर एसडीओ कार्यालयात ठिय्या दिला. शासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात येऊन अकोल्यातील आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा आमच्यावरही कारवाई करा, असा पवित्रा मलकापुरात घेण्यात आला. हा पवित्रा अचानक घेण्यात आल्याने महसूल व पोलीस या दोन्ही प्रशासनांची एकच तारांबळ उडाली. तहसीलदार विजय पाटील यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे देखील उपस्थित होते.
मलकापूर एसडीओ कार्यालयात सर्वपक्षीय नेते व शेतकर्यांचा दोन तास ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:35 AM
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांना स्थानबद्ध केल्याचा निषेधअकोल्यातील शेतकरी आंदोलनाला मलकापूरवासियांचा पाठिंबा